Tecno Pova 6 Pro 5G : 108MP कॅमेरासह Tecno ने लाँच केला पॉवरफुल 5G मोबाईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Tecno ने भारतीय बाजारात Tecno Pova 6 Pro 5G हा आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2024 इव्हेंट मध्ये पहिल्यांदा हा मोबाईल सर्वासमोर सादर करण्यात आला आणि तेव्हापासूनच तो चर्चेत आहे. आता भारतात हा मोबाईल दाखल झाला असून ४ एप्रिल पासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल. आज आपण या मोबाइलचे खास फिचर, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

6.78 इंच डिस्प्ले –

Tecno Pova 6 Pro 5G मध्ये 6.78 इंच फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300 nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफिन मध्ये MediaTek Dimensity 6080 SoC प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल Android 14 आधारित HiOS या ऑपरेटिंग सिस्टीम वर काम करतो. खास गोष्ट म्हणजे मोबाईलला 12GB पर्यंत रॅम देण्यात आली असून वर्च्युअल रॅमद्वारे हीच रॅम आणखी 8GB पर्यंत वाढवता येईल. त्यामुळे मोबाईल हँग वगैरे होण्याची अजिबात शक्यता नाही.

कॅमेरा – Tecno Pova 6 Pro 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईलच्या पाठीमागील बाजूला 108-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आहे. तसेच यासोबत 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट शूटरही देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉलसाठी समोरील बाजूला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोन मध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 70W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. TECNO हा हा मोबाईल IP53 रेटिंग सह येतोय म्हणजेच धूळ आणि पाण्यापासून मोबाईलला कसलीही अडचण येणार नाही.

किंमत किती ?

आता राहिला प्रश्न तो म्हणजे मोबाईलच्या किमतींबाबत, तर Tecno Pova 6 Pro 5G च्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. तर 12GB + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 21,999 रुपये आहे. कंपनी या मोबाईल खरेदीवर ग्राहकांना 2000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. येत्या 4 एप्रिलपासून Amazon वर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध असेल. ग्राहक हा स्मार्टफोन कॉमेट ग्रीन आणि मेटियोराइट ग्रे रंगात खरेदी करू शकतात.