राजेंद्र तांबेंना निरोप देण्यासाठी तहसिलदार विजय पवार बनले स्वतः ड्रायव्हर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शासकीय सेवेत असताना सामान्यांचा न्याय देण्यासाठी व सेवा करण्यासाठी अधिकाऱ्यांने तत्पर असणे गरजेचे असते. कराड येथील नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांनी आपल्या कामातून सेवेचे ब्रीद जोपासले. समाजात केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर त्याच्यातील एक घटक समजून काम केल्याचे उदगार प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी काढले.

कराड तालुक्यातील पाल गावचे असलेले राजेंद्र तांबे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास तहसिलदार विजय पवार, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार विजय पवार, विजय माने, आनंदराव देवकर, कार्यक्रम नियोजन युवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, राजेश सपकाळ, महादेव अष्टेकर यांच्यासह सहकारी कर्मचारी उपस्थित होते.

राजेंद्र तांबे हे 1990 साली पाटण येथील तहसील कार्यालयात लिपीक म्हणून हजर झाले होते. त्यानंतर 1998 ते 2001 अव्वल कारकून- पाटण कार्यालय, 2001 ते 2007 करमणूक कर निरीक्षक उपविभाग कराड, 2008 ते 2012 अव्वल कारकून पाटण तहसील कार्यालय, 2012 ते 2013 भूसंपादन समन्वयक जिल्हाधिकारी कार्यालय सातारा, 2013 ते 2018 नायब तहसिलदार, प्रांत आॅफिस पाटण, 2019 ते 31 डिसेंबर 2021 नायब तहसिलदार, प्रांत आॅफिस कराड येथे काम केले.

कराड येथे प्रशासकीय इमारतीत राजेंद्र तांबे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर तहसिलदार विजय पवार यांनी स्वतः ड्रायव्हिंग करत शासकीय वाहनाने घरी सोडले. तहसिलदारांच्या या कृतीमुळे नायब तहसिलदार राजेंद्र तांबे यांचे कुटुंबियांना गहिवरून आले.

Leave a Comment