व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी धूळ चारली – आंबेडकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरेगाव भीमा इथे आज 204 वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यभरातील मान्यवर शाहिदाना आदरांजली वाहण्यासाठी भीमा कोरेगाव येथे आले होते. वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही याठिकाणी आज भेट दिली. ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटल.

ब्राह्मण्यग्रस्त पेशव्यांच्या बलाढ्य सैन्याला फक्त ५०० सैनिकांनी आपल्या हिमतीच्या,शौर्याच्या बळावर धूळ चारली. ही लढाई सत्तेसाठी नव्हती तर अस्मितेसाठी,अस्पृश्यता घालवण्यासाठी होती. वर्चस्ववादी व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकाला भीमा कोरेगाव शौर्यदिनाच्या क्रांतिकारी सदिच्छा. आज सकाळी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभावर जाऊन शूर वीरांना मानवंदना दिली. अशी फेसबुक पोस्ट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

काय आहे भीमा- कोरेगाव इतिहास

पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेल कोरेगावचे गाव . या गावात 1जानेवारी 1818 या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली. या लढाईची इतिहासात पेशवे विरुद्ध इंग्रज अशी असली तरी या युद्धात ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात महार समाजातील सैन्यबळाचा वापर केला. या लढाईत पेशव्यांच्या सैन्यांची संख्या इग्रजांच्या सैन्यांच्या काहीपट जास्त होती तरीही अवघ्या 16 तासांमध्ये इंग्रजांनी पेशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत त्यांचा पराभव केला. या युद्धात इंग्रजाचा विजय झाला म्हणजेच प्रामुख्याने महार रेजिमेंट जिंकली.

महार रेजिमेंटने लढलेल्या समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली.