तेजश्री रमली गणपती बाप्पाच्या गोड आठवणीत, म्हणाली, मी शाळेत असताना बाप्पाकडे..

tejashri pradhan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. तर सगळीकडे जल्लोषाचे वातावरण पाहिला मिळत आहे. अशा वातावरणातच मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने गणपती बाप्पासोबतच्या आपल्या खास आठवणी माध्यमांशी बोलताना सांगितल्या आहेत. यावेळी बोलताना तिने, “मी आजही बुद्धीच्या देवताकडे बुद्धी मागते” असे सांगितले आहे. तसेच, “गणपती बाप्पा मला लहानपणापासूनच खूप जवळचा वाटतो. त्याला बुद्धीची देवता देखील म्हणतात त्यामुळे मी शाळेत असताना परीक्षेवेळी त्याच्याकडे सेटिंग लावायची” अशी गोड आठवण तेजश्रीने सांगितली आहे.

बाप्पाच्या आठवणीत रमली तेजश्री

गणपती बाप्पासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देत तेजश्री म्हणाली की, लहानपणी मी ज्या सोसायटीत राहायचे तेथे सार्वजनिक गणपती बसवला जायचा. त्यावेळी दरवर्षी विसर्जनाला डान्स करणं, मज्जा करणं या गोष्टी मला प्रचंड आवडायच्या. लहानपणीच्या गणपती बाप्पाची संबंधित सर्व आठवणी आजही माझ्या लक्षात आहेत. व्यावहारी जगातली उंची बाजूला ठेऊन कुठेतरी आपल्याला फक्त माणूस म्हणून छान जगता आलं पाहिजे. कोणाच्याही नजरा तुमच्यावर नाहीत हे आता मी खूप मीस करते.

तसेच, “देवबाप्पा बुद्धी दे’ असं आपण लहानपणापासून म्हणत आलो आहोत. खरंतर ही बुद्धी फक्त शिक्षणापुरती मर्यादीत नसते. तर आयुष्याच्या प्रत्येक पावलावर हवी असते. त्यामुळे बाप्पा मला बुद्धी दे असं मला सतत म्हणायचं आहे.माझ्या काकांकडे पाच किंवा सात दिवसांचा गणपती असतो. प्रत्येक क्षणी बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला वाटत राहतं. बाप्पावर माझा खूप विश्वास आहे. माझ्या आनंदात आणि दु:खात बाप्पा कायम माझ्या सोबत असतो” असे तेजश्रीने म्हणले आहे.

दरम्यान, सध्या सर्वांची लाडकी तेजश्री प्रधान प्रेमाची गोष्ट या नवीन मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या या मालिकेला देखील चाहत्यांकडून तितकाच प्रतिसाद दिला जात आहे. यापूर्वी तेजश्री प्रधान होणार सुन मी या घरची, गोजिरवाण्या घरात अशा सुप्रसिद्ध मालिकांमध्ये दिसली आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.