सातारा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांची सोलापूर ग्रामीणला बदली

Tejashwini Satpute
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते (Tejashwini Satpute) यांची सोलापूर ग्रामिण पोलिस अधिक्षकपदी बदली झाली आहे. अजयकुमार बन्सल यांची सातार्‍याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणुन नियुक्त करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी जाहीर केले आहेत.

सातारा पोलिस दलाच्या अधीक्षकपदाची सूत्रे सुमारे दिड वर्षांपूर्वी तेजस्वी सातपुते यांनी स्वीकारली होती. पदभार स्वीकारल्यानंतर तेजस्वी सातपुते यांनी पोलिस दलासह कर्मचाऱ्यांच्या सक्षमीकरणाचा आराखडा तयार केला. यानुसार त्यांनी सातारा पोलिस दलाचा नावलौकिक आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.

मीरा बोरवण्णकर यांच्यानंतर सातारा पोलिस दलाची सूत्रे स्वीकारणाऱ्या तेजस्वी सातपुते या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. सातपुते यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारी प्रवृत्तींना यशस्वीपणे आळा घालण्याचे काम केले.