जर्मनी । जर्मनीतील रेड क्रॉस रुग्णालयातील एका नर्सने हजारो लोकांच्या जीवाशी खेळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या नर्सला कोरोना लसीचा (Corona Vaccine) तिरस्कार होता. यामुळे तिने सुमारे 8 हजार 600 लोकांना लसीऐवजी सलाइन सॉल्यूशनचे (Vaccine Solution) इंजेक्शन दिले. ही बातमी बाहेर येताच रुग्णालयातून इंजेक्शन घेणाऱ्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. आता रुग्णालयाने सर्व लोकांना पुन्हा येऊन लवकरात लवकर कोरोना लस घेण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीतील रेड क्रॉस हॉस्पिटलमधील एका नर्सला सुरुवातीपासूनच कोरोना लसीवर विश्वास नव्हता. तिने तिच्या फेसबुक पेजवर लसीच्या विरोधात अनेक गोष्टी लिहिल्या. तिच्या पोस्टने लोकांचे लक्ष वेधले जेव्हा अचानक बातमी आली की, हॉस्पिटलच्या एका नर्सने लोकांना लसीऐवजी सलाइन सॉल्यूशनचे इंजेक्शन दिले होते. अशा स्थितीत लोकांना पुन्हा लस घेण्यास सांगण्यात आले आहे.
ग्रामीण भागात लस आणली
द गार्डियनच्या रिपोर्ट नुसार, हे बनावट इंजेक्शन जर्मनीच्या ग्रामीण भागातील लोकांना देण्यात आले आहे. या बातमीनंतर तेथील अथॉरिटीमध्ये एकच खळबळ उडाली. इंजेक्शन आल्यानंतर ही नर्स खारट पाण्याने बदलत असे. यानंतर हे पाणी इंजेक्शनमध्ये भरून लोकांना देण्यात आले.
अशाप्रकारे अथॉरिटीला संशय आला
मार्च आणि एप्रिलमध्ये अनेक लोकांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी बहुतेक वृद्ध होते. जेव्हा लसीकरणानंतरही त्यांना कोरोना झाला तेव्हा प्रशासनाची झोपच उडाली. त्यांनी हे तपासले की असे कसे घडत आहे? जेव्हा त्याची सखोल तपासणी केली गेली तेव्हा असे दिसून आले की नर्सने इंजेक्शनच बदलले आहे. या नर्सचे डिटेल्स अद्याप उघड झालेले नाही. मात्र, पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.