मालिका हरल्यानंतर विराट कोहली म्हणाला,’एक वनडे मालिका गमावल्यानं काही फरक नाही पडत’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । टी -२० मालिकेमध्ये टीम इंडियाने एकतर्फी पद्धतीनं न्यूझीलंडला ५-० अशा फरकाने पराभूत केलं. तेव्हा टी -२० मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही विराट आणि कंपनी सहज विजय मिळवेल असं वाटतं होतं. परंतु झालं अगदी उलटच. हॅमिल्टननंतर भारतीय संघाने ऑकलंडमध्ये एकदिवसीय सामना गमावल्यानंतर ही मालिका संघाच्या हातून निसटली आहे. मात्र, एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने आश्चर्यकारित्या एक बेजबाबदार विधान केलं आहे. मालिका गमावल्यानंतर विराट म्हणाला,”यावर्षी कसोटी आणि टी -२० मालिका महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे एकदिवसीय मालिका गमावण्याने काही फरक पडत नाही.” असं स्पष्टीकरणं विराटनं मालिका गमावल्यानंतर केलं आहे.

पराभवानंतर विराटचे विचित्र विधान
ऑकलंडमधील दुसर्‍या वनडेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला, ”या मालिकेत दोन चांगले सामने झाले, त्याचा चाहत्यांनी आनंद लुटलाच असेल. हा सामना आम्ही ज्याप्रकारे संपवला त्यापासून मी खूप प्रभावित झालो आहे. आम्ही पहिल्या डावात सामना गमावला होता परंतु आम्ही आमच्या फलंदाजीमूळ सामन्यात पुन्हा परत आलो. आम्ही सामन्यात अडचणीत होतो पण जडेजा आणि सैनी यांनी चांगली फलंदाजी केली, श्रेयस अय्यरनेही चांगली कामगिरी बजावली. जर टी-२० आणि कसोटीची तुलना केली तर यावर्षी एकदिवसीय सामने आमच्यासाठी खूप महत्वाचे नाहीत. विराट कोहली पुढे म्हणाला, ‘आम्ही मोकळेपणाने क्रिकेट खेळणार असून, आम्हाला निकालाची काळजी नाही.”

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.