सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांचे मृत्यूचे तांडव सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत 128 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तांसात 49 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर त्या अगोदर 41 आणि 38 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बांधितांच्या मृत्यूने जिल्ह्यात भयभीत वातावरण झालेले पहायला मिळत आहे.
गेल्या चोवीस तासांत 1 हजार 571 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर कोरोनाच्या काळातील मृत्यूचा रेकाॅर्ड आज झाला असून, गेल्या चोवीस तासांत 49 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 15 हजार 042 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांचा संख्या 84 हजार 526 आहे. तर जिल्ह्यात एकूण 67, 329 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर आजपर्यंत 2204 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वाेच्च उंचाक बांधितांचा गेल्या चोवीस तासांतील झाला असून बांधितांच्या मृत्यूचाही उंच्चाक गाठला आहे. गेल्या चार दिवसांपासून स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा