कराडात मोकाट कुत्र्यांची दहशत ; भटक्या श्वानांचा बंदोबस्त का होत नाही ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी । कराड

कराड शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे मागील आठवड्यात श्री हॉस्पिटल परिसरात एका महिलेला मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना ताजी आहे त्यातच पहाटेच्या सुमारास व्यायाम अथवा दुचाकीवरुन जाणाऱ्या नागरिकांचा मोकाट कुत्र्यांचे कळप पाठलाग करत आहेत.

त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाले आहे कराड शहरात कृष्णा नाका परिसरात विविध भागात मोकाट कुत्र्यांचाझुंडीच्या झुडी पहावयास मिळत आहेत.

कृष्णा नाका ते वाकान कडे जाणारा मार्ग कृष्णा फुल परिसर यासह शहरातील मंडई परिसरात ही विविध विभागात मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्याप्रमाणावर वाढला आहे

दक्ष कराडकर या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील प्रशनांसह नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यामुळेच या विषयावर आता पालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

Leave a Comment