हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) लष्करी जवान गंभीर जखमी झाले आहेत. आता स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. या हल्ल्यानंतर ताफ्यातील वाहने शाहसीतारजवळील हवाई तळाच्या आत सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. याबाबत ची माहिती सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराची घेराबंदी करत शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच जखमी झालेल्या जवानांना उपचारांसाठी कमांड हॉस्पिटल, उधमपूर येथे हलवण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. या अड्ड्यावरून त्यांनी काही शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या वाहन ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे.