व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता धार्मिक शाळांमध्येही दिले जाणार पाठ्यपुस्तकी शिक्षण

नवी दिल्ली । राज्यात धार्मिक शिक्षणासाठी सुरू असलेल्या वेदपाठशाळा आणि मदरशांमध्ये आता पाठ्यपुस्तकांचे शिक्षणही दिले जाणार आहे. यामुळे या शाळांना अभय मिळणार असून, नवीन शिक्षण धोरणाच्या अंतिम मसुद्यात याबाबत सूचना करण्यात आली आहे. देशांतील अनेक भागांत धार्मिक आणि पारंपरिक शिक्षण देणाऱ्या वेदपाठशाळा, गुरूकूल, मदरसे आहेत. मात्र यात पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्यात येत नसल्याने त्यांना ‘शाळा’ हा दर्जा प्राप्त नव्हता. परिणामी या शाळांमध्ये पाठ्यपुस्तकी शिक्षण द्यावे, अशी मागणी होऊनही अनेकदा याबाबत ठोस कोणताही निर्णय झाला नाही. मात्र आता नवीन शिक्षण धोरणाच्या अंतिम मसुद्यात याबाबत अधिक स्पष्टता आणत या संस्थांमध्येही पाठ्यपुस्तकी शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

या संस्थांमध्ये सध्या देण्यात येणाऱ्या धार्मिक आणि पारंपरिक शिक्षणाबरोबरच आता गणित, विज्ञान, समाजशास्त्र, हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषा याचे शिक्षण दिले जाणार आहे. तसेच या संस्थांनाही धोरणानुसार निश्चित करण्यात येणारी अध्ययन निश्चपत्ती लागू राहणार आहे. अशा संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पहिली ते बारावीपर्यंत पाठपुस्तक शिक्षण घेणे बंधनकारक असेल. ते स्थानिक शिक्षण मंडळामार्फत परीक्षा देऊ शकतील. यामुळे त्यांना उच्च शिक्षणाचीही संधी मिळेल. यासाठी संस्थांमध्ये प्रयोगशाळा उभारण्यात याव्यात, अशी सूचनाही या अंतिम मसुद्यात करण्यात आली आहे. यासाठी संस्थांना आर्थिक सहाय्यही दिले जाईल. विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक स्तरावर शिष्यवृत्ती देण्यात यावी, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”