Friday, June 2, 2023

फुंकर मारताच १ मिनिटांत कोरोना रिझल्ट; ‘हे’ टेस्ट किट तयार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा कोरोनाव्हायरस संपूर्ण जगात वेगाने पसरला, तेव्हा त्याच्या तपासणी तसेच उपचारासाठीच्या कोरोना टेस्ट किटबद्दल बरेच विवाद झाले. या त्रासातून मुक्त झाल्यानंतर चीनकडून या कोरोना टेस्ट किट उर्वरित देशांना अत्यंत महागड्या दराने पुरविल्या गेल्या. यातील बर्‍याच किट या सदोष असल्याचे आढळले आणि त्यांचे रिझल्टही अचूक असल्याचे दिसून आले. भारतासह अनेक देशांनी या खराब टेस्ट किट चीनला परत केल्या. कधी अँटीबॉडी टेस्ट किट, तर कधी आरटी-पीसीआर टेस्ट किटबद्दल प्रश्न उपस्थित होत होते. कधीकधी त्यांच्या निकालांविषयी तर कधी त्यांच्या किमतींविषयी गडबड जाणवत होती. आता इस्त्राईलने ३,८०० रुपयांची एक कोरोना टेस्ट किट बनवल्याचा दावा केला आहे, जी फुंकर मारल्यानंतर अवघ्या १ मिनिटातच रिझल्ट देईल. त्याचे रिझल्ट हे ९० टक्क्यांपर्यंत अचूक असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

फुंकर मारल्यानंतर मिळालेल्या ड्रॉपलेट्स मधून व्हायरसची तपासणी केली जाईल
इस्त्राईलच्या बेन-गुरियन विद्यापीठातील संशोधकांनी बनवलेल्या या इलेक्ट्रो-ऑप्टिकल कोरोना टेस्ट किटमध्ये नाक, घसा आणि फुंकरमधून नमुने घेतले जातात. हे किट ज्या लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत अशा एम्म्प्टोमॅटिक लोकांच्याही कोरोना पॉझिटिव्ह संक्रमणाची अचूक टेस्ट देखील करू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या किटमध्ये सेट केलेला एक खास प्रकारचा सेन्सर कोरोना विषाणूची ओळख पटवितो. जेव्हा रुग्ण या किटमध्ये फुंकतो तेव्हा विषाणू थेंबांद्वारे सेन्सरपर्यंत पोहोचतो. हा सेन्सर क्लाऊड सिस्टमशी कनेक्ट केलेला आहे. यानंतर हा सेन्सर सिस्टमचे विश्लेषण करून सांगतो की, रुग्ण पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह. इतर पीसीआर टेस्ट पेक्षा या टेस्ट किटची किंमतही कमी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. तसेच ही टेस्ट कोठेही करता येते. यासाठी कोणत्याही लॅबची गरज नाही.

विमानतळ, बॉर्डर, स्टेडियम, थिएटरमध्ये उपयुक्त असल्याचे सिद्ध होईल
विमानतळ, बॉर्डर, स्टेडियम यासारख्या ठिकाणी हे टेस्ट किट खूप उपयुक्त ठरणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी, त्वरित निकाल देणारी ही कोरोना टेस्ट किट जास्त यशस्वी होईल. बीजीयूमधील स्कूल ऑफ इलेक्ट्रिक अँड कंप्‍यूटर इंजीनियरिंगचे संशोधन उप-प्रमुख आणि इलेक्‍ट्रो-ऑप्टिकल इंजीनियरिंगचे फॅकल्टी प्रो. गॅबी सरुसि यांनी हे कोरोना टेस्ट किट बनवण्याची कल्पना मांडली. बायोवॉर्ल्डच्या अहवालानुसार हे किट लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) मान्यता मिळवण्याची तयारी त्यांची टीम करत आहे. सरुसीच्या म्हणण्यानुसार, क्लिनिकल ट्रायल सुरू झाल्यापासूनच या टेस्ट किटचा चांगला परिणाम मिळतो आहे. याच्या मदतीने कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रूग्णांची तपासणी केली जाऊ शकते.

कोविड -१९ला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शोधण्याचे काम सुरु
सरुसीच्या टीमने संरक्षण मंत्रालयाबरोबर या किटच्या क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत. यासाठी १२० इस्त्रायलीना या क्लिनिकल ट्रायलसाठी निवडले गेले. टेस्टमध्ये टीमला ९० टक्के अचूक रिझल्ट्स मिळाले. पीसीआर किट व्हायरसचे आरएनए आणि डीएनए ओळखते आणि रिपोर्ट देते. त्यामुळे, रिपोर्ट मिळण्यास बर्‍याच तासांचा कालावधी लागतो. त्याच वेळी, हे इस्त्रायली किट एका मिनिटातच रिझल्ट देते. त्याशिवाय पीसीआर किट्सच्या चाचणीसाठी प्रयोगशाळेत धोकादायक नमुने घेणे हेदेखील आव्हानात्मक आहे. यामुळे कर्मचाऱ्यानाही संसर्गाचा धोका असतो. या नवीन किटद्वारे आरोग्य कर्मचाऱ्यांची ही समस्याही दूर होईल. सरुसी म्हणाले की ,’अद्याप या किटची क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. आता आम्ही या किटसह कोविड -१९ला त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत.

श्वासोच्छवासाद्वारे बाहेर येणाऱ्या ड्रॉपलेट्स मध्ये कोरोनाव्हायरस
नुकत्याच झालेल्या संशोधनात (न्यू स्टडी) असे दिसून आले आहे की, जर एखादी व्यक्ती जोरात बोलली तर त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले हजारो ड्रॉपलेट्स हे १४ मिनिटांपर्यंत हवेमध्ये राहू शकतात. त्याच वेळी, सामान्यपणे बोलताना श्वासोच्छ्वास सोडल्यानंतर निघणारे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स हे ८ मिनिटे हवेमध्ये राहू शकतात. म्हणजेच, इतक्या वेळेनंतर हे रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स धूळ कणांबरोबर कुठल्याही पृष्ठभागावर पोहोचतील. संशोधन अहवालात म्हटले आहे की रुग्णालये, नर्सिंग होम, कॉन्फरन्स रूम, सुपरस्टोअर्स, समुद्रपर्यटन जहाजे अशा ठिकाणी लोकांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याचे हे एक कारण असू शकते. या अभ्यासामध्ये, मनुष्य बोलत असताना श्वासाने तोंडातून बाहेर पडत असलेल्या हजारो ड्रॉपलेट्सवर संशोधन करण्यासाठी लेझर लाइटचा वापर केला गेला. यावेळी संशोधकांना असे आढळले आहे की मोठ्याने बोलणारी व्यक्ती एका मिनिटात किमान १००० ड्रॉपलेट्स सोडते, ज्यामध्ये व्हायरस देखील असू शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.