हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने सादर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध दर्शवत ते मागे घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात मांडलेले कृषी विधेयक मागे घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे नेते केंद्रात जाऊन तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र विधीमंडळात हा कायदा दुरूस्तीसाठी मांडतात. पण हे कृषी कायदे सरसकट रद्द करावेत अशी आमची मागणी आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारच्या वादात आम्हाला पडायचे नाही. महाराष्ट्राने केंद्राचे तिन्ही कृषी कायदे बाजूला सारून महाराष्ट्राचा स्वतंत्र असा कृषी कायदा करावा.
केंद्र सरकारने तीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादलेले आहेत. या देशातील धनदांडग्या लोकांसाठी कायदे केलेले आहेत, ते शेतकऱ्यांसाठी नाहीत असे म्हणत हे कायदे सरसकट रद्द झाले पाहिजे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.