मोठी बातमी!! आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार

thackeray group
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भरघोस यश मिळवलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas आघाडी) विधानसभेत मोठा फटका बसला. त्यामुळेच पुढील निवडणुकीच्या रणनीतीबाबत महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

आगामी महापालिकेच्या निवडणुकीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, “आम्हाला आपल्या ताकदीवर विश्वास आहे. यामुळे येत्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे” म्हणजेच आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे आता जाहीर झाले आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र देखील समोर आले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सध्या अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा राजकिय वर्तुळात रंगल्या आहेत. कारण मध्यंतरी काँग्रेस आणि ठाकरे गटावर टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले होते की, “काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ होत नाही आणि शिवसेनेला अजून जाग येत नाही” त्यानंतर आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या गेल्या आहेत.