पुणे : हॅलो महाराष्ट्र – खासदार गजानन किर्तीकर हे शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. यानंतर संजय राऊत यांनी गजानन किर्तीकर यांच्यावर टीका करत त्यांच्यावर निशाणा साधला. किर्तीकर यांना लोकं विसरून जातील असे संजय राऊत म्हणाले. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर पाटील (sanjeev bhor patil) यांनी अहो, संजय राऊत कधीतरी आत्मपरीक्षण करणार आहात की, नाही. कधीतरी आत्मचिंतन करणार आहात की, नाही, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला.
काय म्हणाले संजीव भोर पाटील?
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उठा प्रायव्हेट लिमिटेड बनविलं होतं. त्यामागे तुमच्यासारखे कानफुके लोकं चुकीचं मार्गदर्शन करत होते. तुमच्या कान भरण्यामुळंच गजानन किर्तीकर यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत जात आहेत. यामुळे 40 आमदार नि 12 खासदार शिंदे यांच्यासोबत गेले. 103 दिवस जेलमध्ये राहिलात. तुम्ही म्हणता 103 दिवस जेलमध्ये राहिलो म्हणून 103 आमदार निवडून आणणार. अहो राऊत तुम्ही 288 दिवस तुरुंगात राहिले असता तर तुम्ही 288 आमदार निवडून आणण्याची भाषा केली असती का, असा सवालदेखील संजीव भोर पाटील (sanjeev bhor patil) यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.
गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र गजानन किर्तीकर यांचा अजूनही उद्धव ठाकरे गटामध्ये आहे. गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने संजय राऊत, अरविंद सावंत यांनी किर्तीकर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिंदे गटाचे प्रवक्ते (sanjeev bhor patil) यांनी उत्तर दिले आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!