हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. येत्या 25 ऑगस्टला घटनापीठाकडे या प्रकरणावर पहिली सुनावणी पार पडेल.
यावेळी कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीलाही 2 दिवसांची स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हा बाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशा सूचना कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 25 ऑगस्टला निवडणूक आयोगाची सुनावणी पार पडेल. त्यामुळे 25 ऑगस्ट हा दिवस राज्यातील सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकरणाच्या सुरुवातीपासून हे संपूर्ण प्रकरण खंडपीठाकडे सोपविण्यात येईल अशी शक्यता होतीच. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण 5 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. त्यामुळे सत्तासंघर्षातील हा तिढा लांबणीवर पडला आहे.
Supreme Court orders Election Commission not to take any action till Thursday on the application filed by Maharashtra Chief Minister Eknath Shinde's camp for recognition as the 'real Shiv Sena' party and allotment of the 'bow and arrow' symbol to it.
— ANI (@ANI) August 23, 2022
16 बंडखोर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, राज्यपालांनी घेतलेल्या बहुमत चाचणीवर शिवसेनेने घेतलेला आक्षेप तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड, मुख्य प्रदोत निवड, विधानसभा उपाध्यक्षांबाबत बंडखोर आमदारांनी आणलेला प्रस्ताव अशा एकूण 5 याचिकांवरील सुनावणी आता गुरुवारी ५ न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर होईल. शिवसेना नेमकी कोणाची? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची याचाही फैसला घटनापीठ करेल.