हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या गटाला कोणत्या आधारावर राज्यपालांनी मान्यता दिली? राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षाला महत्त्व दिले पाहीजे अन्यथा देशात आयाराम, गयारामचे युग येईल असं म्हणत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्य न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. राज्यातील सत्तासंघर्षावरील आजची सुनावणी संपली असून उद्या कपिल सिब्बल पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत.
आज दुपारच्या सत्रानंतर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद वाद केला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरून शिंदे गट आणि तत्कालीन राज्यपालांना कोंडीत पकडले. अध्यक्ष आणि राज्यपाल फक्त पक्षाला गृहित धरतात. आमदाराची कुठलीही इतर ओळख नसते. आमदार ज्या तिकिटावर निवडून आले, त्या पक्षापेक्षा ते महत्त्वाचे नसतात. राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांनी केवळ आमदारांच्या आकड्यांना नव्हे तर राजकीय पक्षालाही महत्त्व दिले पाहीजे अन्यथा देशात आयाराम, गयारामचे युग येईल असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी; सत्तेचा डाव कोणावर पलटणार?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/2OUZHmw5e0#Hellomaharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 15, 2023
घटनेच्या कोणत्या आधारावर 34 आमदार म्हणतात की ते शिवसेना पक्ष आहे? शिवसेना हा नोंदणीकृत पक्ष आहे. 4 जुलैपर्यंत कुणीही त्या निर्णयावर आक्षेप घेतला नव्हता किंवा तो बदलला नव्हता. मग शिंदे गट असा दावा कसा करू शकेल की आम्ही शिवसेना आहोत? राज्यपालांनी बहुमत चाचणीचा निर्णय न घेता वेगळं नेतृत्व स्वीकारणाऱ्या 38 आमदारांना त्याच वेळेला आयोगाकडे पाठवायला हवं होतं. राज्यपाल राजकीय पक्षाव्यतिरिक्त कुणालाही सरकार स्थापनेसाठी मान्यता देऊ शकत नाही असं कपिल सिब्बल यांनी म्हंटल.