Thane Borivali Twin Tunnel : ठाणे ते बोरीवली फक्त 15 मिनिटांत; हा दुहेरी बोगदा 2028 पर्यंत पूर्ण होणार

Thane Borivali Twin Tunnel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Thane Borivali Twin Tunnel । बहुप्रतिक्षित ठाणे ते बोरिवली जुळ्या बोगद्याबाबत राज्य सरकार ऍक्शन मोडमध्ये आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘ठाणे–बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पा’संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली, या बैठकीत हा प्रोजेक्ट २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेत . सुरक्षितता आणि पर्यावरणीय मानकांचे पालन केले पाहिजे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकदा का ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा पूर्ण झाला कि मग मुंबईकरांचा १ तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येणार आहे.

काय आहेत मुख्यमंत्र्यांचे निर्देश- Thane Borivali Twin Tunnel

१) राज्यातील कोणताही पायाभूत प्रकल्प यापुढे रखडणार नाही याची दक्षता घ्या आणि प्रत्येक प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करा.
२) ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे.
३) दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करा.
४) बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानमधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करा.
५) प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी, रात्री काम करण्याची परवानगी घेण्यात यावी.
६) बोरीवली बाजूकडील काम गतीने पुढे जाण्यासाठी आणि या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून १ महिन्यात कार्यवाही पूर्ण करा.
७) यंत्रणांनी समन्वय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करा.
८) संबंधित अधिकाऱ्याने 1 महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे. Thane Borivali Twin Tunnel
९) बोरीवली बाजूकडील अदानी, टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीचे संपादन करा.
१०) भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन द्यावे.

ठाणे-बोरीवली ट्वीन टनल प्रकल्पाविषयी थोडक्यात –

ठाणे ते बोरीवली दुहेरी बोगदा 11.84 किलोमीटर लांबीचा आहे. हा प्रकल्प (Thane Borivali Twin Tunnel) 2 पॅकेज मध्ये उभारण्यात येणार आहे. बोरीवली बाजूने 5.75 किलोमीटर पॅकेज 1 आणि ठाणे बाजूने 6.09 किलोमीटर पॅकेज 2 असणार आहे. पॅकेज 1 मध्ये ₹6,178 कोटी आणि पॅकेज 2 मध्ये ₹5,879 कोटी अशाप्रकारे एकूण ₹12,057 कोटींचा खर्च या प्रकल्पाला अपेक्षित आहे. एकदा का हा बोगदा पूर्ण झाला कि मग मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून फक्त १५ मिनिटांवर येईल. यामुळेच इंधनाचा वापर कमी होईल, खर्च कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन दरवर्षी १.४ लाख मेट्रिक टनांनी कमी होईल.