‘तो’ निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाच- शरद पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे का सोपवला? असा सवाल अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. ते कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे काल एसटी कामगार संघटनेच्या ५६व्या अधिवेशनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध प्रश्नांवर लक्ष वेधले. कोरेगाव-भीमा प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, आम्हाला असं वाटतं की, ”भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्य सरकारच्या गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडे सगळ्या विशेषता जैन समाजाच्य लोकांची आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया ज्यावेळी इथं सुरू झाली. म्हणजे सकाळी ९ ते ११ बैठक झाली आणि ३ वाजता केंद्र सरकारने हे काम आपल्याकडे काढून घेतलं. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असं असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणं योग्य नाही. आणि त्यांनी जर काढून घेतलं तरी महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणं अजूनह योग्य नाही.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) तपास सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. माझा निर्णय फिरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. एनआयए तपासावरून केंद्र-राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला असताना राज्य सरकारने माघार घेत त्यास सहमती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला अधिकार वापरून हा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केलेल्या नाराजी वर काय प्रतिक्रिया येतात ते पाहावं लागणार आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment