11 महिन्याच्या चिमुकल्याला बिबट्याने भर दुपारी तोंडात धरुन नेलं; त्यानंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | शिराळा तालुक्यातल्या तडवळे येथे भर दुपारी बारा च्या दरम्यान ऊस तोड कामगारांच्या अकरा महिन्याच्या मुलाचा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. सुफीयान शमशुद्दीन शेख असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे.या घटनेमुळे नागरिक, शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्यांचा बंदोबस्त कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या गावाच्या सिद्धेश्वर मंदिराजवळील अंत्री च्या शिवारातील कृष्णात शामराव पाटील यांच्या शेतातील उसाला तोड आली होती. यासाठी शमशुद्दीन शेख यासह पाच कुटुंबातील महिला पुरुष ऊस तोड करत होते. या ठिकाणी सुफीयान यासह दोन इतर मुलांना बसविले.सुफीयान याला ऊसाच्या बारक्या कांड्या करून खाण्यास दिल्या. इतर दोन मुले थोडी मोठी असल्याने ते इतरत्र खेळत होती. दुपारी बारा च्या दरम्यान शेजारी ऊसाच्या शेतात लपलेल्या बिबट्याने संधी साधून सुफीयान याच्या नरड्याला पकडून उसात धूम ठोकली ही घटना सुफीयान च्या वडिलांनी पहिली व त्यांनी आरडाओरडा केला.

यावेळी सर्वच ऊस तोड कामगारांनी बिबट्याचा पाठलाग केला. यामुळे तीनशे फुटावर बिबट्या बालकाला टाकून पळून गेला. या जखमी बालकाला ऊसतोड कामगारांनी तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. याबाबत पोलीस पाटील वैशाली पाटील यांनी पोलीस ठाण्यात वर्दी दिली. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय येथे नागरिकांनी गर्दी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment