नवी दिल्ली | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा आठवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. योजनेसाठी तुम्हीदेखील अर्ज केला असेल तर आपल्या हातात दोन हजार रुपये मिळतील की नाही हे त्वरित तपासा.
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजना अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात. हे पैसे दोन हजाराच्या तीन हप्त्यात दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते. या योजनेचे संबंधित 11 कोटी 74 लाख लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात आठव्या हप्त्याचे पैसे लवकरच जमा करण्यात येणार आहेत.
प्रधानमंत्री किसान च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपण आपलं स्टेटस तपासू शकता. आपल्याला आतापर्यंत किती हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत? तसेच पुढील हप्त्याची स्थिती काय आहे? जर एखादा हप्ता रोखण्यात आला आहे त्यामागचं कारण काय आहे? जर तुम्हाला वाटतं की माहितीमध्ये गडबड आहे? तर तुम्ही त्यात सुधारणा सुद्धा करू शकता.
असा पहा तुमचा स्टेटस
1) प्रथम प्रधानमंत्री किसान योजनेच्या http://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2)त्यासोबत ‘beneficiary status’ या पर्यायावर क्लिक करा.
3)त्यानंतर नवीन पेज ओपन होइल.
4) यावर आधार कार्ड क्रमांक, बँक अकाउंट नंबर किंवा मोबाइल यापैकी एक पर्याय निवडा.
5) या तीन क्रमांकाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात पैसे येतात की नाही हे तुम्ही तपासू शकता.
6) तुम्ही जो पर्याय निवडला आहे त्या ठिकाणी योग्य तो क्रमांक भरा.
7) त्यानंतर ‘Get deta’ या पर्यायावर क्लिक करा.
8) मग तुम्हाला तुमच्या सर्व व्यवहाराची माहिती मिळेल.
9) कुठल्या बँक खात्यात पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत याची देखील माहिती मिळेल.
या योजनेचा पहिला हप्ता हा दरवर्षी 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीमध्ये मिळतो दुसरा हप्ता एक ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता एक डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत मिळतो मोदी सरकारने 24 फेब्रुवारी 2019 रोजी या योजनेची सुरुवात केली आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा