आबापूरी-वर्णेची यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर धार्मिक सोहळ्याने होणार संपन्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या आबापूरी-वर्णे (ता.सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथांची वार्षिक यात्रा यंदा कोविड 19 चे सर्व नियम पाळत सर्व धार्मिक विधींसह संप्पन्न होणार आहे. तहसिलदार आशा होळकर यांचे उपस्थितीत पार पडलेल्या यात्रा आढावा बैठकीत यासंबधी निर्णय करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक डॉ. सागर वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. रोहित जाधव, तासगावचे मंडलाधिकारी बेसके, सरपंच विजय पवार व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बळवंत काळंगे यांची उपस्थिती पार पडली.

मार्च 26 ते 29 या दरम्यान यात्रा सोहळा होत असून शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनूसार यात्रेचे आयोजन देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने केले जाणार आहे. यात्राकाळात कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन येणाऱ्या भाविकांनी व ग्रामस्थांनी करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच यात्रा काळात कुठे ही गर्दी करू नये, सामाजिक अंतर व मास्कचा वापर करावा. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी,असे देखील होळकर यांनी यावेळी नमूद केले. यात्राकाळात आरोग्य विभागाची एक सक्षम टीम या ठिकाणी डॉक्टरांसह कार्यरत राहणार असून ती सर्व आरोग्य विषयक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवेल असे डॉ. पवार यांनी सांगितले.

यात्रेत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी बोरगाव पोलिस दल जादा कुमक मागवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशिल राहील, अशी ग्वाही सहाय्यक पोलिस निरिक्षक डॉ. वाघ यांनी दिली. येणाऱ्या यात्रेकरूंसाठी स्वच्छ व मुबलक पाणी ‌तसेच स्वच्छतेच्या इतर सुविधा प्रामुख्याने पुरविण्यास ग्रामपंचात तत्पर असल्याचे सरपंच विजय पवार यांनी‌ सांगितले. यात्रेस येणाऱ्या यात्रेकरूंना वाहतूकीसाठी एसटी बसची सोय एसटी आगाराच्यावतीने केली जाणार असल्याचे वाहतूक निरिक्षक पठाण यांनी‌ सांगितले.

एकंदरीत मागिल दोन वर्षांपासून कोविडमुळे स्थगित झालेली ‌यात्रा यंदा मात्र केवळ कोविडचे सर्व नियम पाळत का होईना पण संप्पन्न होणार म्हणून सर्व भाविकांना सुटकेचा निश्वास टाकला आहे. बैठकीस उपसरपंच सुषमा काळंगे, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, तलाठी रेखा कोळी, आरोग्य, पोलिस, वीजवितरण, महसूल, ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रविण धस्के यांनी केले तर आभार नाथाजी पवार यांनी मानले.

Leave a Comment