हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल ड्रग्ज घेणे जणू फॅशन झाले आहे. यामुळे अत्याधिक लोक या व्यसनाच्या आहारी जाताना दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सिने इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांचा समावेश आहे. नुकत्याच एका अभिनेत्रीला मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत तिच्या वाढदिवसाची पार्टी करत असताना ड्रग्जचे सेवन करणे चांगलेच महागात पडले आहे. पार्टीदरम्यान पोलिसांनी छापा टाकून या सगळ्यांना अटक केली आहे. या अभिनेत्रींचे नाव नायरा नेहल शहा असे आहे. हि एक तेलगू अभिनेत्री आहे. तिने तेलगू भाषिक अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून टॉलिवूड इंडस्ट्रीमधील ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
https://www.instagram.com/p/CHpjWqHprlf/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री नायरा नेहल शहाने आपल्या वाढदिवसाची पार्टी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आयोजित केली होती. दरम्यान हि पार्टी साधी सुधी नसून ड्रिंक्स आणि ड्रग्ज पार्टी होती. तिच्या या पार्टीला तिचे बरेच जवळचे आणि खास असे मित्र आणि मैत्रीण आले होते. ही अभिनेत्री आणि तिचे मित्र मैत्रीण या पार्टीत मद्यधुंद होऊन ड्रग्सचे सेवन करत होते. दरम्यान या पार्टीबद्दल पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी लगेच त्या हॉटेलवर छापा मारला. या छाप्यादरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात महागडे असे ड्रग्स जप्त केले. शिवाय या प्रकरणात अभिनेत्री नायरा नेहल शहाला पोलिसांनी अटक केली आहे.
https://www.instagram.com/p/B-jaRAbJzNr/?utm_source=ig_web_copy_link
हि घटना रविवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास घडली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रातोरात कारवाई करत हॉटेलवर छापा मारला आणि या पार्टीत ड्रग्स घेणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. सांताक्रूझ पोलिस स्थानकातील पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर गनोरे यांना ड्रग्स पार्टीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसोबत या हॉटेलवर छापा मारला. दरम्यान नायरासह आणि तिचा मित्र आशिक हुसैन यांना चरस घेताना पोलिसांनी रंगे हाथ पकडले. मात्र तूर्तास त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. अभिनेत्री नायरा नेहल शहा हीने काही तेलगूसह काही तमीळ चित्रपटांमध्येही काम केले आहे.