काबूल । अफगाणिस्तानात तालिबानचे युग परत आले आहे. अल्पावधीतच या दहशतवादी संघटनेने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न असा उपस्थित होतो आहे की, तालिबानला दहशतवादी योजना राबवण्यासाठी कोण फंडिंग कोण देते? तालिबान किती कमावते? ही संस्था शस्त्रे कोठून खरेदी करते? चला तर मग या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात …
संयुक्त राष्ट्रांच्या जून 2021 च्या रिपोर्ट नुसार, तालिबानची वार्षिक कमाई 2011 पर्यंत सुमारे 300 मिलियन डॉलर्स होती, जी अलिकडच्या काही वर्षांत वाढून 1.5 अब्ज डॉलर्स झाली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 1 अब्ज 11 कोटी 32 लाख 55 हजार रुपये आहे.
तालिबान अंमली पदार्थांचा व्यवसाय करतात, त्यांच्या ताब्यातील भागातून प्रचंड टॅक्स गोळा करतात. एका गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की, तालिबानला फक्त ड्रग्ज तस्करीमधून 460 मिलियन डॉलर्स मिळतात.
संयुक्त राष्ट्रांच्या रिपोर्ट नुसार, तालिबानने गेल्या वर्षी खाण संबंधित कामांद्वारे 464 मिलियन डॉलर्स कमावले. यावरून असे दिसून येते की, तालिबानला लढाऊ सैनिकांची भरती करण्यासाठी, फंडिंग साठी किंवा शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासाठीही संघर्ष करावा लागत नाही.
तालिबानला मोठ्या प्रमाणात डोनेशनही मिळतात. ज्या संस्थांना ‘नॉन-गव्हर्नमेंट चॅरिटेबल फाउंडेशन नेटवर्क’ म्हणतात त्या संस्थांकडून त्यांना फंड दिला जातो. याशिवाय तालिबानला त्यांच्या श्रीमंत समर्थकांकडूनही पैसे मिळतात.
काही तज्ञ म्हणतात की,” तालिबानला पाकिस्तान आणि इराणकडून पैसे मिळतात. मात्र, यासाठी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. अफगाणिस्तानला बळाने ताब्यात घेण्यासाठी तालिबानने आधीच पुरेसा फंड गोळा केला आहे.
जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तान सरकारने 2018 मध्ये 11 अब्ज डॉलर्स खर्च केले, त्यापैकी 80 टक्के परदेशी मदतीच्या स्वरूपात आले. तर तालिबान कोणत्याही मेहनतीशिवाय याहून जास्त पैसे कमवत आहे.