Big Breaking News : कोरोना संकटातून वाचण्यासाठी आता पुण्यात घेतली जाणार लष्कराची मदत

पुणे महानगरपालिकेत निर्णय : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस विदारक बनत चालली आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील रुग्णालयेही आता अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ रुग्णालयांवर आलीय. अशावेळी पुण्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी आता भारतीय लष्कराची मदत घेतली जाणार आहे. पुणे महानगर पालिकेने याबाबत निर्णय घेतला असून याची अंलबजावणीही केली जाणार आहे.

पुण्यात सध्या व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता पुण्यातील लष्कराचं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांनासाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आलीय. लष्कराच्या रुग्णालयात ICU बेडसह अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. पुणे प्रशासनानं लष्कराकडे रुग्णालय उलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. आज संध्याकाळपर्यंत लष्कराकडून उत्तर येण्याची अपेक्षा असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे लष्करानं जर आपलं रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं करुन दिलं, तर कोरोना संकटात पुणे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

रुग्णांसाठी हॉटेल्स भाड्याने घेण्याची वेळ
पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने जिल्ह्यात बेड्स कमी पडत आहेत. पुण्यात गेल्या 15 दिवसात दररोज चार हजार रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे रुग्णांना ठेवण्यासाठीच्या बेड्सची संख्या कमी झाली आहे. पुण्याच्या रुबी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयाने तीन हॉटेल्स भाड्याने घेतल्या असून या ठिकाणी 180 बेड्स उलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुबी रुग्णालयाशिवाय पुण्याच्या सरकारी रुग्णालय आणि इतर रुग्णालयात बेडसची झपाट्याने कमतरता जाणवत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पुण्यात सध्या किती रुग्ण?

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 लाख 83 जार 819 रुग्ण इतकी आहे. यापैकी 2 लाख 38 हजार 890 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात सध्या 39 हजार 518 सक्रिय रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत 5 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचा मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका आहे. शहरासह जिल्ह्याची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे.. त्यामुळे आता लसीकरण आणि कडक निर्बंध हाच त्यावर उपाय आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना स्थिती चिंताजनक
पुणे जिल्ह्याची आकडेवारी पाहिली तर काल दिवसभरात 10 हजार 226 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 58 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. काल दिवसभरात पुणे जिल्ह्यात 6 हजार 462 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यात संध्या 81 हजार 514 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 93 हजार 130 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 5 लाख 1 हजार 446 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10 हजार 340 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.

You might also like