Friday, June 9, 2023

विदर्भात आज उष्णतेची लाट, पहा राज्यात कोणत्या भागात कधी धडाकणार अवकाळी

पुणे | राज्यात उष्णतेचा कहर वाढतोच आहे. त्यातच विदर्भात आजही उष्णतेची लाट कायम राहणार आहे. मराठवाडा ते कोमोरीन परिसरात आणि तमिळनाडू व कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणात होत आहेत. शुक्रवार पासून मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा दणका देणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

दोन दिवसांपासून अंदमान समुद्राच्या उत्तर भाग व म्यानमारच्या किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रीय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दोनशे मीटर उंचीवर आहे तर तेलंगणा ते तमिळनाडूचा उत्तर-दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होत असून तमिळनाडूच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहेत. त्यामुळे उन्हाचा चटका वाढून उकाड्यात वाढ होत आहे.

दरम्यान मागील 24 तासात विदर्भातील ब्रह्मपुरी येथे देशातील उच्चांकी 43.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले आहे. दरम्यान अनेक ठिकाणी तापमानात मोठी तफावत आढळून येत असून नागपूर येथे 19.3 अंश सेल्सिअस ची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहणार आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत चार अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाल्याने पारा 40 अंश सेल्सिअस वर सरकला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आज आणि उद्या वातावरणात आणखी वेगाने बदल होण्याची शक्यता आहे.

येथे होणार अवकाळी पाऊस

शुक्रवार – भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा ,यवतमाळ
शनिवार – कोल्हापूर,परभणी, हिंगोली, नांदेड,जालना,अकोला, अमरावती,भंडारा,बुलढाणा, चंद्रपूर,गडचिरोली, गोंदिया नागपूर,वर्धा, वाशीम, यवतमाळ

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group