इस्लामाबाद । पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खानच्या अडचणी वाढतच आहेत. कारण पाकिस्तानच्या लष्कराने माजी पंतप्रधान नवाझ शरीफला देशात परतण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानला तुमची गरज असल्याचे नवाझ शरीफला सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हे घडले. याअंतर्गत आता नवाझ शरीफला बोलावून इम्रान खानला बाहेरचा रस्ता दाखविण्याची योजना आहे.
नवाझ शरीफला पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. एक एव्हॉनफिल्ड मालमत्ता प्रकरण आणि दुसरे अल अझिझिया मिल्स प्रकरण. डिसेंबर 2019 मध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. तो कोर्टात हजर झाला नाही. बेहिशोबी मालमत्ता आणि उत्पन्नाचा स्रोत माहित नसल्याबद्दल न्यायालयाने नवाझ दोन 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती तर एव्हॉनफिल्ड प्रकरणात तपासात सहकार्य न केल्याने त्याला एक वर्षाची शिक्षा झाली होती.
त्याच वर्षी नवाझ शरीफला अल अझिझिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षाही झाली होती. त्याची या मिल्समध्ये अवैध गुंतवणूक आढळून आली. शिक्षा एकाच वेळी चालू होती. सध्या नवाझ शरीफ लंडनमध्ये राहत आहे. नोव्हेंबर 2019 ला लाहोर उच्च न्यायालयाने त्याला उपचारासाठी चार आठवडे जाण्यासाठी दिलासा दिला होता.
सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, गिलगिट बाल्टिस्तानचे मुख्य न्यायाधीश राणा एम शमीम यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून दावा केला आहे की, तत्कालीन सीजेपी साकिब निसार यांनी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना आदेश दिले होते की, नवाझ शरीफ आणि त्याची मुलगी मरियम नवाजला 2018 च्या जनरलच्या निवडणुकांच्या आधी जामिनावर सोडू नये. लष्कराच्या परवानगीनेच हे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.