2009 पासून भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांची सर्वात मोठी विक्री, सलग पाचव्या महिन्यात काढले पैसे

0
90
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतीय बाजारात परकीय गुंतवणूकदारांची विक्री थांबण्याचे नाव घेत नाही. FPI सलग पाचव्या महिन्यात विक्रेते राहिले आहेत. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारातून आतापर्यंत 18,856 कोटी रुपये काढले आहेत. भू-राजकीय तणाव आणि यूएस मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता यामुळे FPI बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

डिपॉझिटरी डेटानुसार, 1-18 फेब्रुवारी दरम्यान, FPIs ने इक्विटीमधून 15,342 कोटी रुपये आणि डेट किंवा बाँड मार्केटमधून 3,629 कोटी रुपये काढले आहेत. यादरम्यान त्यांनी हायब्रीड शेअर्समध्ये 115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

फेब्रुवारीमध्ये 18,856 कोटी रुपये काढले
अशा प्रकारे त्यांची निव्वळ काढणी 18,856 कोटी रुपये झाली आहे. भारतीय बाजारातून विदेशी फंडस् काढून घेण्याचा हा सलग पाचवा महिना आहे.

मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर-मॅनेजर रिसर्च हिमांशू श्रीवास्तव म्हणाले, “अलिकडच्या काळातील भू-राजकीय तणाव आणि फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर FPIs भारतीय स्टॉकमधून बाहेर पडत आहेत. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ करण्याचे संकेत दिल्यानंतर त्यांची विक्रीही तीव्र झाली आहे.”

सुमारे 8 अब्ज डॉलर्स
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की,”युक्रेनवरून अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदार बॉण्ड्स आणि सोने यासारख्या सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांकडे वळले आहेत.” ते म्हणाले की,” गेल्या एका वर्षात FPIs ने भारतीय स्टॉकमधून सुमारे 8 अब्ज डॉलर्स काढले आहेत. 2009 नंतरचा हा सर्वाधिक आकडा आहे.”

मार्केट कॅप
गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 85,712.56 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वात जास्त वाढला. समीक्षाधीन आठवड्यात TCS ची मार्केट कॅप 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपये झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 32,014.47 कोटी रुपयांनी वाढून 16,39,872.16 कोटी रुपये झाले.

एचडीएफसीने या आठवड्यात 2,703.68 कोटी रुपये जोडले आणि तिची मार्केट कॅप 4,42,162.93 कोटींवर पोहोचली. बजाज फायनान्सची मार्केट कॅप 1,518.04 कोटी रुपयांनी वाढून 4,24,456.6 कोटी रुपये झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here