सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
वाई तालुक्यातील बावधन (जि. सातारा) येथील राज्यातील सर्वात मोठी असणारी बगाड यात्रा यावर्षीही उत्साहात पार पडली. जिल्हा प्रशासनाने या वर्षी कोरोना संसर्गामुळे यात्रा-जत्रा वर जमावबंदी घातली असताना, येथील यात्रा कमिटी आणि भाविकांनी प्रशासनाच्या नियमांना पायदळी तुडवत यात्रा उत्साहात साजरी केली.
पोलीस उपाधीक्षक शीतल जानवे- खराडे, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर -चौगुले, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाने बावधन व परिसरातील ११ गावामध्ये २७ मार्च १४ एप्रिल या काळात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. मात्र येथील यात्रा कमिटी व भाविकांनी प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी केली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/132117898868000
बावधन मध्ये कोरोना बधिताची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. येथील भैरवनाथाच्या यात्रेसाठी होळी पौर्णिमेच्या रात्री मंदिरामध्ये बगाड्या ठरविण्यात येतो. यावेळी संचार बदलू गाडीची निवड झाल्याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. तरीही आज शुक्रवार 2 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात बघा यात्रेस प्रारंभ झाल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आता काय कारवाई होणार याकडे, लोकांचे लक्ष लागून आहे. प्रशासनाने बावधन बरोबर फुलेनगर या गावची काळेश्वरी देवीची यात्राही रद्द करण्याचा आदेश दिला होता. यावर्षी बावधन येथील बगाड यात्रा रंगपंचमी दिवशी म्हणजे २ एप्रिल या दिवशी आली आहे. वाई उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडून आदेश 27 तारखेपासून 4 एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले होते.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा