पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक; छोट्या गुंतवणुकीतून मोठा फायदा मिळू शकेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रत्येकला वाटते की आपले भविष्य हे सुनिश्चित असावे. आणि त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशिल असतो. चांगल्या भविष्यासाठी पैश्यांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करताना लोक नेहमी वेगवेगळे पर्याय निवडत असतात. जास्त पैसे मिळवण्याच्या लोभात कधी कधी लोक मोठी रिस्क पण घेतात. तुम्हाला कमी वेळात कमी रकमेत मोठा निधी मिळवायचा असेल तर, ‘टपाल कार्यालय वारंवार रेकरिंग डिपॉजीट योजना’ तुमच्या कामी येऊ शकते. या योजनेमधून तुम्हाला 7.10 टक्के व्याज मिळणार आहे.

पोस्ट ऑफिस रेकरिंग डिपॉझिट योजनेअंतर्गत आपल्याला दर महिन्याला 1000 रुपये भरावे लागतात. अश्या 12 महिन्याच्या गुंतवणुकीवर 7.10% व्याजदराने आपल्याला 12468.84 रुपये मिळतात. आणि 5 वर्ष गुंतवणूक केल्यावर 72122.97 रुपयांचा निधी आपल्याला मिळतो. यामध्ये 60000 ही आपली मुद्दल असते तर 12122.97 रुपये इतके व्याज पकडून आपण संपूर्ण रक्कम ही 72122.97 रुपये इतकी प्राप्त करू शकता. या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला महिन्याच्या निश्चित तारखेला गुंतवणूक जमा करावी लागते.

या योजनेमध्ये समजा तुम्ही तुमची पहिली गुंतवणूक महिन्याच्या पहिल्या तारखेस जमा केली तर, दर महिन्याला तुम्ही 1 ते 15 या तरखेदरम्यान गुंतवणूक जमा करू शकता. आणि पहिली गुंतवणूक 16 तारखेस जमा केली तर तिथून पुढची गुंतवणूक 16 ते महिना संपेपर्यंत कधीही जमा करू शकता. भारत सरकारच्या पोस्ट ऑफिस च्या योजनांमध्ये आपल्याला 4 ते 8.4% व्याजदर मिळत असतो. आपल्याला ह्या सगळ्या योजनांची माहिती इंडियन पोस्ट च्या ऑफिसल वेबसाईट वर मिळेल.

Leave a Comment