वसई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकणी एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीबरोबर एक तरुणसुद्धा आला होता. मात्र हा मृतदेह आढल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांचे लग्न ठरलेले होते. मात्र हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
वसई पश्चिम येथील स्टेटस हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या हॉटेलच्या एका रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सायली शहाणे असे या मृत तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सायली हि आपला मित्र सागर नाईक सोबत स्टेटस हॉटेलमध्ये आली होती. पण त्यानंतर संध्याकाळी सागर नाईक सायलीला हॉटेलमध्ये सोडून निघून गेला.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी रूम मधून कोणीच बाहेर न आल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रूम साफ करण्यासाठी सकाळी रुमचा दरवाजा वाजवला पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी हॉटेलमधून जाऊ रूमची पाहणी केली असता सायलीचा मृतदेह आढळून आला. मृत सायलीच्या मानेला आणि डोक्यावर जबर मार लागल्याचे निशाण आढळून आले आहे. मृत सायली आणि तिचा मित्र सागर नाईक हे दोघेही वसई येथील एव्हर शाइन या परिसरातील रहिवाशी होते. या दोघांचे काही दिवसांनी लग्न होणार होते. मात्र अचानक आज सायलीचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.