“कोणीही केला नसेल असा मूर्खपणा त्यांनी केलाय”; राज्यपालांच्या वक्तव्यप्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा समाचार बच्चू कडू यांनी घेतला आहे. “एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेले असेल पण आपण काय वाचतो आणि आपण काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे,” अशी टीका कडू यांनी केली.

बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील राज्यपाल हे पद आहे ते खूप मोठ पद आहे. त्या पदाचा गरिमा राखणे महत्वाचा आहे. राज्यपालांनी तुलनात्मक बोलण अतिशय निंदनीय आहे. हे अतिशय निंदनीय आहे. ‘मला वाटतं एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेल असेल कदाचित. पण आपण काय वाचतो आणि आपण काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे.

यावेळी बच्चू कडू यांनी नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. नवाब मलिक यांनी राजीनामा द्याचा काही विषयच नाही. ईडी हा शासकीय विषय नसून तो भाजपच्या कार्यालयातला एक भाग आहे. ईडीची कारवाई ही भाजपची कारवाई ही भारतीय जनता पक्षाची कारवाई आहे. त्यामुळे ती शासकीय कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले मी भविष्यावर जात विश्वास ठेवत नाही, मी वर्तमानावावर विश्वास ठेवतो,” असे बच्चू कडे यांनी म्हंटले आहे.

Leave a Comment