Monday, March 20, 2023

विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; घटनास्थळीच केले शवविच्छेदन

- Advertisement -

औरंगाबाद : गुरुवारी दुपारी वाळूज येथील हिरापूर परिसरात एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळल्याची माहिती समोर आली आहे. दीपक सुभाष मुळे (२८,रा. लांजी) असे मृताचे नाव आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, हिरापूर शिवारात असलेल्या विकास देशपांडे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. पोलीस उप निरीक्षक गोरख चव्हाण, उपनिरीक्षक मनीषा केदारे, पोलीस नाईक विठ्ठल खंडाळे यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर मनपाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दुपारी २ वाजेच्या सुमारास मूर्तादेह बाहेर काढण्यात आला.

- Advertisement -

दरम्यान, पोलिसांनी जिकठांचे डॉ. उज्वल चव्हाण यांना घटनास्थळी बोलावले व घटनास्थळीच शवविच्छेदन केले. पोलीस चौकशीत हा मृतदेह दीपक सुभाष मुळे यांचा आहे असे समोर आले. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.