वर्धा नदीत आंघोळ करायला गेले असताना मुलासह आईचा बुडून मृत्यू

vardha crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – महाशिवरात्रीच्या दिवशी वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेल्या आईचा आणि मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर-लोणवलीच्या वर्धा नदी घाटावर ही धक्कादायक घटना घडली आहे. आंघोळीला गेलेला मुलगा खोल पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच मुलाला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी मारली मात्र या दोघांचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पदमा अरकोंडा, व रक्षित अरकोंडा अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. हे दोघेही तेलंगणातील लोणवाही या ठिकाणचे रहिवाशी होते. या घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मायलेकरांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले.

मुलाला वाचविण्यासाठी धावली आई
महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भाविक शिवमंदिरांना ठिकठिकाणी भेट देत असतात. ही शिवमंदिरं पहाडावर तसेच काही नदीकिनारी आहेत. यादरम्यान वर्धा नदी पात्रात आंघोळ करायला गेलेला मुलगा खोल पाण्यात गेला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपल्या मुलाला बुडताना पाहून आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तिचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बऱ्याच प्रयत्नानंतर मायलेकाचा मृतदेह काढला
तेलंगणा राज्यात येणाऱ्या लोणवाही येथील पदमा अरकोंडा, रक्षित अरकोंडा हे दोघे माय-लेक महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला गेले होते. त्या ठिकाणी वर्धा नदी पात्रात आंघोळीला गेले. यावेळी गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर-लोणवाही घाटावर मुलगा आंघोळ करीत असताना खोल पाण्यात गेला आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपल्या मुलाला बुडताना पाहून आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता तिचादेखील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बऱ्याच प्रयत्नानंतर मायलेकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.