संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख ठरली; ‘या’ दिवशी होणार बजेट सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशासह राज्यात कोरोनाचे संकट आहे. अशात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संसदेतील अधिकारी आणि जवळपास 400 कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यामुळे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान आता अधिवेशनाची तारीख हि ठरली असून संसदेचे बजेट सत्र दि. 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन सत्रात पार पडणार असून 31 जानेवारीपासून अधिवेशनाला सुरुवात होईल. 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील अधिवेशन 12 मार्चला सुरु होणार आहे. तर, 8 एप्रिला अधिवेशनाची समाप्ती होणार आहे.

कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यानंतर मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पार्लमेंट हाऊसची पाहणी केली होती. संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला. त्यानंतर खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. संसदेच्या इमारतीमध्ये कोरोना चाचणी आणि कोरोना लसीकरणाची यंत्रणा उभारण्यात आली आहे.

Leave a Comment