सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
साताऱ्यातील वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक चालत्या कारने पेट घेतल्याची घटना आज (सोमवारी) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली असून आगीमध्ये संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. आगोमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील वाई-पाचगणी येथे मुंबईतील चार पर्यटक कारने फिरण्यासाठी आले होते. दरम्यान त्यांची कार वाई-पाचगणी रस्त्यावर दांडेघर गावानजीक आली असता कारने अचानक पेट घेतला. त्यावेळी कारमधील प्रवासी कारमधून खाली उतरले. अचानक कारणे पेट घेतल्याचे पाहताच परिसरातील नागरिकांसह कारमधील प्रवाशांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारने जास्तच पेट घेतल्याने या घटनेची माहिती नागरिकांनी पाचगणी पोलीसांना दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांसह अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम केले जात आहे.
Satara News : पाचगणी-वाई रस्त्यावर चालत्या कारने घेतला पेट pic.twitter.com/bozKm8smNT
— santosh gurav (@santosh29590931) February 13, 2023
अचानक चालत्या कारला लागलेली आग शॉर्टसर्किटमुले लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. कारने पेट घेतल्यानंतर महाबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये कार संपूर्ण जळून खाक झाली आहे.