हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसामुळे महापूर आला. अनेक लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले तर काही ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भेदभाव न करता राज्याला मदत करावी अशी विनंती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषांच्या बाहेर जाऊन मदत करण्यात येत आहे मात्र केंद्र सरकारनेही मोठा भाऊ म्हणून जबाबदारी घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातदेखील पूरग्रस्त गावांत शिवसेनेची आरोग्य शिबीरे सुरू करण्यात आली आहेत. यासाठी ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे मोफत फिरता दवाखाना शिरोळ तालुक्यातील नरसोबाची वाडी, जैनापूर येथे दाखल झाला असून आरोग्य शिबिरांना सुरुवात झाली आहे