हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| इंटरनेटच्या माध्यमातून भारतीयांची फसवणूक करणाऱ्या चीनी वेबसाइट्सला केंद्र सरकारने झटका दिला आहे. केंद्र सरकारने 100 हून अधिक चीनी वेबसाइट्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अनेक गुंतवणुकीशी संबंधित घोटाळ्यांसाठी भारतीयांना लक्ष्य करणाऱ्या या वेबसाईट विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र पाठवून 100वेबसाइट ब्लॉक करण्याचे आवाहन केले आहे. मुख्य म्हणजे, भारताचे सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने यांच्यासाठी प्रतिकूल असल्याचे कारण देत गेल्या काही वर्षात सरकारने सुमारे 250 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
महत्वाचे म्हणजे, सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, TikTok, Xender, Shein, Camscanner असे अनेक भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. या ॲपला लाखोंपेक्षा जास्त भारतीयांनी डाउनलोड केले होते. परंतु, हे ॲप्स युझर्सचा डेटा गोळा करत होते. या डेटाचा वापर ते अयोग्य कामांसाठी करत होते. त्यामुळे या ॲप्स विरोधात कठोर कारवाई करत त्यांच्यावर बंदी घालण्यात आली.
दरम्यान, अलीकडेच PUBG किंवा Battlegrounds Mobile India नावाचा गेम्स Google Play Store आणि Apple App Store वरून काढून टाकण्यात आल्या आहेत. यामध्ये बॅटल रॉयल गेमने भारतात खूप लोकप्रियता मिळवली होती. फक्त एका वर्षात या गेमचे 100 दशलक्षपेक्षा जास्त वापरकर्ते निर्माण झाले होती.