हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ओमिक्रोन रुग्णसंख्या वाढत चालली असून याच पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानंतर केंद्र सरकारही देशातील ओमीक्रोन रुग्णसंख्या जास्त असलेल्या राज्यात आरोग्य पथक पाठवणार आहे. यामध्ये महाराष्ट्रचा समावेश आहे .
केंद्राचे आरोग्य पथकाच्या टीम या देशातील १० राज्यांमध्ये पाठवण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यामध्ये महाराष्ट्रासोबत केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाब या राज्यांचा समावेश आहे.
कोरोना चाचणी, करोनासंबंधित नियमांचं पालन, त्यांची अंमलबजावणी, रुग्णालयात उपलब्ध बेड्स यांची पाहणी या केंद्रीय पथका कडून करण्यात येईल. रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर आणि मेडिकल ऑक्सिजन यांची उपलब्धता किती आहे याचा आढावा या पथका कडून घेण्यात येईल तसेच लसीकरण आणि त्याचा वेग याचीही पाहणी या पथकाकडून करण्यात येईल.