हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत तीन महत्त्वाच्या प्रकल्पांघेऊन 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दावोस येथे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या दालनात एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित हा करार मंजूर करण्यात आला आहे. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हे तिन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
ग्रीन हायड्रोजन प्रकल्प
यातील पहिला मुख्य प्रकल्प ग्रीन हायड्रोजनचा आहे. या प्रकल्पासाठी आयनॉक्स एअर प्रॉडक्शनबरोबर 25 हजार कोटींच्या सामंजस्य करारावर एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी झाली आहे. यावेळेस मुख्यमंत्र्यांबरोबर कंपनीचे सिद्धार्थ जैन यांनी चर्चा केली. आयनॉक्स ही एक औद्योगिक वायू उत्पादित करणारी अमेरिकन कंपनी आहे.
देशातील एक मोठा उद्योग समूह असलेल्या बी.सी. जिंदाल यांच्याशी ४१ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर आज #दावोस येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सामंजस्य करारामुळे इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग… pic.twitter.com/rbkO9zRSpj
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 16, 2024
जिंदाल उद्योग समूहाबरोबर करार
राज्य सरकारने बी. सी. जिंदाल यांच्याबरोबर 41 हजार कोटींच्या सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे आता इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात राज्यातील तरुणांना 5000 नोकऱ्या मिळणार आहेत.
एआय हब प्रकल्प
महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हबची निर्मिती करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडीक्शन्स यांच्यामध्ये 4 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा सामंजस्य करार देखील सरकारने केला आहे. या करारामुळे भारतामध्ये पहिलाच हा प्रकल्प असणार आहे. या करारावर महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक अमोल शिंदे आणि क्वेड कंट्री नेटवर्कचे चेअरमन कार्ल मेहता यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
दरम्यान, भारतामध्ये ह्युंदाई मोटर्स 7 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुण्यातील तळेगाव येथील प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी ह्युंदाईकडून हे गुंतवणूक करणार आहे. या करारावर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्वाक्षरी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.