अरे बापरे ! शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48 टक्के

Corona
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोनाची तीसरी लाट दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. काल औरंगाबाद शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 48.27 टक्क्यांवर पोहोचला आहे. दिवसभरात तब्बल 779 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पॉझिटिव्हिटी रेट 44 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. आता 100 नागरिकांची तपासणी केली, तर किमान 49 जण बाधित आढळून येत आहेत. वाढलेला संसर्ग लक्षात घेता प्रशासनाची झोप उडाली आहे. शहरात आणखी काही कडक निर्बंध लावावेत का असा विचार प्रशासनाने सुरू केला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ज्या पद्धतीने रुग्णांना त्रास होत होता, तसा आता नाही. त्यामुळे आयसीएमआरच्या गाईडलाइन्सनुसार 95 टक्के रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आली आहे. मनपाकडून तपासण्या बंद करण्यात आल्या आहेत. जे नागरिक स्वतः हून येत आहेत, त्यांचीच तपासणी केली जात आहे. काल दिवसभरात 1618 जणांची कोरोना टेस्ट केली. त्यातील 779 जण बाधित असल्याचे सायंकाळी समोर आले आहे. शहरात सक्रीय रुग्णांची संख्या 5394 आहे. त्यातील 5017 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.