शिवसेनेची 25 वर्ष युतीत सडली; उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली. भाजपसोबत 25 वर्षे युतीत सडली असे म्हणत त्यांनी भाजपवर प्रहार केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेची गेली 25 वर्ष भाजप सोबत युती होती. आपली 25 वर्ष युतीमध्ये सडली. माझं आजही तेच मत आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटल. बाळासाहेब म्हणायचे की राजकारण हे गजकर्णासारखं आहे, जेवढं खाजवावं तेवढी अधिक खाज येतं. तसे हे सगळे राजकारणातील गजकर्णी आहेत असा टोलाही त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले, मध्यंतरी अमित शहा पुण्यात आले. म्हणाले एकट्यानं लढा. ठिक आहे… आम्ही एकट्यानं लढू.. पण मग तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर करायचा नाही. राजकारणात जसं भिडायचंय असतं तसं भिडा, मग होऊन दे सामना.. इडीची पिडा लावायची आणि लढ म्हणायचे, अशांनी आव्हान देण्याची शिवसैनिकाला गरज नाही असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला.