औरंगाबाद – शहरास पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या 56 व 100 दलली योजनेवरील नवीन व जुने जायकवाडी उद्भव पंपगृहास महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मार्फत जोडणी करण्यात आलेल्या दोन्ही स्वतंत्र 33 के. व्ही. उच्च दाब विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे मनपा प्रशासनाने एका प्रसिद्धि प्रत्रकाद्वारे कळविले आहे.
तसेच आज सकाळी तीन वेळेस साधारणतः एकुण एक तास व जालना 33 के. व्ही. स्वतंत्र उच्च दाब विद्युत वाहिनीवरील केबल जळाल्याने ती काढण्यासाठी पुनस्थ 11 ते 12 म्हणजेच एक तास सदर दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जालना 33 के. व्ही. स्वतंत्र विद्युत वाहिनीवरील जळालेली विद्युत केबल बदलुन जोडण्यासाठी 16:30 ते 17:25 एकुण 55 मिनीटे जायकवाडी उद्भव पंपगृहाचा विद्युत पुरवठा महावितरण कंपनीमार्फत खंडीत करण्यात आला होता. त्यानुसार आज एकुण 3 तास 35 मिनीटे जायकवाडी उद्भव येथील दोन्ही पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने विद्युत खंडण कालावधीत दोन्ही योजनेवरील पाणी उचल पुर्णत: बंद ठेवावी लागली असल्याने शहरातील पाणी वितरण विस्कळीत झाले आहे .
उपरोक्त कारणामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पुढील काही काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्यास काही कालावधी लागणार आहे. या दरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रश्नाद्वारे करण्यात आले आहे.