जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला लॉकडाऊनचा आढावा

0
34
sunil chavan 1
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आवाहनानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह पोलीस पथक संपूर्ण हद्दीत फिरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी दिसेल त्या ठिकाणी जावून त्यांना आप -आपल्या घरी जाण्याची विनंती करत आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत असून या विषाणूने अनेकांचे बळी घेतले तर कित्येकांना बाधीत केले आहे. राज्य शासन अतिशय गांभीर्याने दररोज मोठमोठे निर्णय घेत असून त्या निर्णयाच्या अंमलबजावणीचे काम जिल्हा प्रशासन तातडीने करीत आहे.

शहराच्या अनेक भागात बेजबाबदारपणाचे दर्शन घडत असल्याने आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वतः शहरातील विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना कोरोना विषयी नियमांचे पालन करण्यास सांगत होते. बाजारात विनाकारण खरेदीसाठी बाहेर जाऊन गर्दी करू नका, शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी सहकार्य करा, त्रिसूत्री चे पालन करा अशा अनेक सूचना त्यांनी केल्या. औरंगाबादकरांनो आता तरी स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या,मास्क,सोशल डिस्टनसिंग,सॅनिटाईझर चा वापर करा,गर्दी टाळा असे आवाहन हॅलो महाराष्ट्र करत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here