औरंगाबाद – आरोग्य विभागाच्या परीक्षेचा गोंधळ सुरु असतांना आता पोलीस भरतीच्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. औरंगाबाद शहर पोलीस दलासाठी होणाऱ्या भरतीची उद्या (20 ऑक्टोबरला) रोजी परीक्षा आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळाले नसल्याने विध्यार्थी हतबल झाले आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभाग परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे बोट दाखवत आहे तर संबधित कंपनी पोलिसांकडे बोट दाखवत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/4533645270025312/
औरंगाबाद शहर पोलीस दलातील कॉन्स्टेबल पदासाठी भरती होत असून,उद्या यासाठी लेखी पेपर घेतला जाणार आहे. मात्र परीक्षेसाठी काही तास शिल्लक राहिले असतानाही परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना अजूनही हॉल तिकीट मिळाले नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्तालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली, मात्र त्यांना परीक्षा घेणाऱ्या संबधित कंपनीला संपर्क करण्याचा सल्ला देण्यात आला. तर विध्यार्थ्यानी कंपनीच्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला असता त्यांना पोलिसांकडे जाण्याचे सांगण्यात आले. राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढण्यात आली होती. त्यावेळी हजारो मुलांनी फॉर्म भरले होते. मात्र कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्याने ही परीक्षा घेण्यात येत असून, औरंगाबाद शहर पोलीस दलासाठी 20 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा होणार आहे.
मात्र 2019 मध्ये जेव्हा फॉर्म भरली गेली त्यावेळी मराठा समाजाला एसईबीसी आरक्षणमधून फॉर्म भरता येत होते. त्यामुळे अनेक विध्यार्थीनी भरले सुद्धा, पण पुढे हे आरक्षण रद्द झाल्याने या विध्यार्थ्यांना ईडब्लूएस किंवा ओपन मधून फॉर्म बदलण्याचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे जवळपास अनेक विध्यार्थ्यानी ईडब्लूएस मधून फॉर्म भरले. मात्र आता ईडब्लूएसमधून फॉर्म भरलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट देता येणार नसल्याचे सांगतिले जात आहे. मग ईडब्लूएसमधून फॉर्म भरलेल्या उमेदवारांना जर हॉल तिकीट द्यायचे नव्हते तर तो पर्याय दिलाच कशाला असा प्रश्न विध्यार्थी विचारत आहे.