ग्राहक सरंक्षण 2019 कायदा आजपासून देशभरात लागू; समजून घ्या त्यातील ठळक मुद्दे

दिल्ली । ग्राहक संरक्षण कायदा 20 जुलै पासून देशभरात लागू केला जाणार आहे अधिसूचना 15 जुलै रोजी केंद्र मंत्रायलायकडू न काढली गेली होती. 1986 रोजी तयार केलेला ग्राहक संरक्षण कायद्याची जागा हा नवीन 2019 हा कायदा घेणार आहे. जुन्या कायद्यांमध्ये नसलेल्या अनेक नवीन तरतुदी या कायद्यांमध्ये असणार आहेत. नवीन कायद्याअंतर्गत ग्राहकांच्या हिताकडे दुर्लक्षित केल्यास कंपन्यांना याचा मोठा फटका बसू शकतो. ग्राहकांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती वर या कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

नवीन कायद्याबद्धलची माहिती हि केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी दिली. आजपासून २० जुलै ला ग्राहक संरक्षण कायद्याची अंबलबजावणी होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात सांगली, सातारा, यवतमाळ, उस्मानाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, जळगाव, धुळे, चंद्रपूर, रत्नागिरी, सोलापूर, अकोला, भंडारा,वर्धा व सांगली या जिल्ह्यात जिल्हा मंच कार्यालये कार्यरत आहेत.
नवीन कायद्यानंतर्गत ग्राहक संरक्षण कायद्धा २०१९ मधील काही ठळक मुद्धे –
१. नवीन कायद्याअंतर्गत ग्राहकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई केली जाणार.
२. ग्राहक देशातील कोणत्याही ग्राहक मंचाकडे तक्रार करू शकतात.
३. ऑनलाईन टेलीशॉपिंग कंपन्यांचा पहिल्यादाच समावेश करण्यात आला आहे.
४. खाण्या – पिण्यातल्या वस्तूंमध्ये भेसळ केल्यास दंड व तुरुंगवासाची कारवाई केली जाणार.
५. याचिका आता ग्राहक मंचाकडे सुद्धा दाखल करता येणार आहे.
६. ग्राहक मंचाकडे १ कोटी तक्रारी दाखल केल्या जाणार .
७. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगात १० कोटींपेक्षा जास्त प्रकरणाची सुनावणी केली जाणार आहे.

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन केले गेले आहेत. ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने आजपासून या कायद्याची अंबलबजावणी सुरु होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.