रात्री लागली हळद अन पहाटेच नवरीने संपवले प्रियकरासोबत जीवन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जालना  |  हळदीच्या अंगाने घरातून पलायन करून नवरीने मामाच्या मुलासोबत गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील मालखेडा येथे उघडकीस आली आहे. स्नेहा राजू आव्हाड आणि नवनाथ सुरेश गायकवाड अशी मृतांची नावे आहेत .

या बाबतची माहिती अशी की , स्नेहा राजू आव्हाड ( रा मुबंई ) या मुलीचे तालुक्यातील कोळेगाव येथील शुभम संतोष साळवे सोबत  रविवारी 16 मे रोजी दुपारी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह आयोजित करण्यात आला होता . या विवाहासाठी मुलींकडील नातेवाईक कोळेगाव येथे आले होते.

मात्र शनिवारी 15 मे रोजी रात्री मोठ्या उत्साहात हळदीचा कार्यक्रम झाला. नवरीला व नवरदेवाला हळद लावण्यात आली व  रात्री उशिरा सर्व जण झोपी गेले. मात्र पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान स्नेहा आव्हाडही तिच्या मामाचा मुलगा नवनाथ सुरेश गायकवाड ( 21 रा मालखेडा, कोळेगाव ) सोबत मालखेडा येथे आली व सुरेश गायकवाड यांच्या घरात दोघांनी आपण एकत्र जगण्या मरणाची शपथ घेतली आहे.

असे म्हणत झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असुन नवरदेव रुग्नाल्यात सुखी संसाराचे स्वप्र बघत असलेला शुभम साळवे याला आपल्या भावी पत्नीने आत्महत्या केल्याचे कळताच त्याची तबियत खालवली त्यामुळे त्याला भोकरदन दाखल येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास भोकरदन पोलीस स्टेशन उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलशिग बहुरे , पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजाराम तडवी अधिक तपास करीत आहेत .

Leave a Comment