अपंग वृद्धाचा आगीत होरपोळून मृत्यू

0
41
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई 

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे एका६० वर्षीय अंपग वृद्धाचा खाटेवर झोपून असलेल्या अवस्थेत जागीच जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९वाजता घडली

हरिदास बालाजी वाघमारे वय६०वर्षे रा.शेंदूरजना बाजार जिल्हा अमरावती असे मृतकाचे नावं आहे,माहितीनुसार सदर मृतक व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून आजारी होता पायाने अपंगत्व आलेल्या अवस्थेत तो अनेक वर्षांपासून मरणावस्थेत राहत्या घरी खाटेवर पडून होता,सकाळी बाजूला चूल पेटली असतांना त्याची ठिणगी खाटेवर असलेल्या गादीवर पडली यात वृद्ध इसम गादीवर झोपला होता मात्र तो अपंग असल्याने त्यांना हातपाय हलवता आले नाही त्याच त्याचा आगीत जागीच कोळसा होऊन दुर्दैवाने मृत्यू झाला.

सदर मृतक अंत्यत हलाखीची परिस्थितीत जीवन जगत होता,त्यांची पत्नी शेत मजुरीला गेली होती, घराच्या शेजारी राहणाऱ्या माणसांना घरातून धूर येतांना दिसला. लोक त्यांना वाचवायला येणार तो पर्यंत त्या व्यक्तीचा आगीत होरपोळून मृत्यू झाला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here