Thursday, October 6, 2022

Buy now

“महाराष्ट्र कधीही दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही”; भाजप मोर्चातून आशिष शेलार यांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवक्ते नवाब मलिक याच्या राजीनामा मागणीसाठी आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपकडून विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित मोर्चातील सभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. “आजचा मोर्चा हा जनतेचा आक्रोश आणि व्यथा मांडणार मोर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार एका राष्ट्रीय गुन्हेगाराला मदत करत आहेत. त्यांनी वेळीचं नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावा. महाराष्ट्र कधी दाऊदच्या कराची समोर झुकणार नाही,” असा इशारा शेलार यांनी यावेळी दिला.

आज मुंबईतील आझाद मैदानावर भाजपचा विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले की, आज मुंबईत लाखोंच्या संख्येने लोक आझाद मैदानावर आले आहेत. इतिहासात जेव्हा नोंद केली जाईल तेव्हा कोरोना नंतर कोणता मोर्चाचे काढण्यात आला. तर तो भाजपचा होता, असे लिहले जाईल. मुंबई बॉमस्फोटाच्या घटनेला अठावीस वर्षे झाली. दाऊदने आ देशावर आक्रमण केले. या बॉमस्फोटात निष्पाप लोकांचा काहीही दोष नव्हता. शेकडो लोक मेली.

आता भगवं वादळ आलं आहे. सरकारला धारेवर धरल्या शिवाय आम्ही थांबणार नाही. काही केल्या आम्ही थांबणार नाही. हा विरोध आणखी तीव्र होणार आहोत. फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत. मात्र, ठाकरे सरकार मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत, असे शेलार यांनी यावेळी म्हंटले.