सातारा | जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटण आणि माण तालुका वगळता जिल्ह्यात पावसाने हजेरी लावलेली पहायला मिळाली. तर अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने व पावसाने मोठे नुकसान केले आहे.
जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 19.10 मि. मी., जावळी- 32.04 मि.मी. पाटण-35.08 मि.मी., कराड-32.92 मि.मी., कोरेगाव-6.11 मि.मी., खटाव-5.81 मि.मी., माण- 0.42 मि.मी., फलटण- 0.00 मि.मी., खंडाळा- 2.45 मि.मी., वाई – 18.14 मि.मी., महाबळेश्वर-94.7 याप्रमाणे आतापर्यंत एकूण 22.53 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी झालेल्या दिवसभराच्या पावसाने महाबळेश्वर, जावळी, कराड व पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी घरांच्या पडझडी झालेल्या आहेत. तर पाचगणी येथे विजेचे खांबही वाकलेले होते. चार तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झालेला होता.